महाराष्ट्राची एकमेव व पहली उर्दू ISO शाळा राजगुरूनगर , ता-खेड , जि -पुणे

    महाराष्ट्राची एकमेव व पहली उर्दू ISO शाळा
                                         अमजद सरफराज हुसेन
                जि . प. उर्दू  प्राथ शाळा राजगुरूनगर , ता-खेड , जि -पुणे 
                                      भ्रमणध्वणी : ८८५५०३३९७७
                   राजगुरूनगर शहर म्हणजे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म स्थान. भीमा नदीच्या काठी बसलेला गाव.हुतात्मा राजगुरू वाड्याच्या शेजारी जि . प. उर्दू शाळा भरते . सदर शाळेची स्थापना सन २००२ साली पुण्याची तंजिम - ए-वालेदेन शिक्षक पालक संघ नावाची संस्था व स्थानिक लोकांच्या संमतीने मुस्लिम मुलांना त्यांच्या मातृभाषेतुन शिक्षण देण्याचा उद्देशा साठी सुरू करण्यात आली. २००५ साली जि.प.पुणे तर्फे शाळेत २ शिक्षक आले.
                  दोन्ही शिक्षकांनी स्थानिक लोकांना व पालकांचा चांगला समन्वय ठेवून नविन इमारत मंजूर केली. लोक वर्गणी व SSA अनुदान वापरुन सुसज्ज इमारत बांधली गेली. पाठपुरावा करून नविन वर्ग मंजूर करून शाळा ७वी पर्यंत झाली.
                  २० पट असलेली शाळेचा पट ८४ पर्यंत गेला. शाळेची गुणवत्ता व नाविन्य पूर्ण उपक्रम बघून समाजात शाळे बद्दलची गैर समज दूऱ होऊ लागली आणि इंग्रजी माध्यम चे मुले जि.प.उर्दू शाळेत येऊ लागले.शाळेचा माध्यम जरी उर्दू  असला तरी १ली पासून ते ७वी पर्यंतचे मुले व मुली इंग्रेजीत संभाषण करतात. ५वी ते ७वी पर्यंतचे १०० % विद्यार्थी संगणकाचा वापर करतात.
                  काही विद्यार्थी मेडिकल , इंजिनीअरिंग व फार्मसीचे उच्च शिक्षणाला गेलेले आहे. २०१४ साली पंचायत समिति खेड जि - पुणे च्या अधिकारी व पदअधिकार्‍यांनी सदर शाळेला ISO मानांकन प्राप्त करण्यासाठी सूचना दिली.आणि  ISO कडे वाटचाल सुरू झाली . लोक वर्गणी , पालकांचा सहभाग, स्थानिक लोकांचा सहभाग अधिकारी व पद अधिकार्‍यांचा समन्वय घालून एक लाख पन्नास हजारांचा निधि गोळा केली . या निधिचा वापर भोतिक सुविधा साठी केला.
                   २८ मार्च २०१५ रोजी ISO अधिकार्‍यांची तपासणी झाली . गुणवत्ता व सर्व निकष तपासून अधिकार्‍यांनी ४ एप्रिल २०१५ रोजी जि.प. उर्दू प्राथ शाळा राजगुरूनगर ,ता-खेड , जि-पुणे हे महाराष्ट्राची पहली ISO मानांकन प्राप्त उर्दू शाळा घोषित केली . अशा प्राकारे नविन असून आम्ही मोठी मजल मारली...


Comments